Shivsena List Of Star Campaigners
Shivsena List Of Star Campaigners

Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, 'या' दिग्गज नेत्यांचाही समावेश

शिंदेंच्या शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, जे पी नड्डा, नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्यासह शिवसेनेचे मंत्री या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अध्यक्ष (RSP) महादेव जानकर, (PRP) जोगिंदर कावडे, शिवसेना नेते रामदास कदम, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांचा समावेश करण्यात आलाय.

तसच मीना कांबळी, खासदार श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संदिपान भुमरे, दादाजी भुसे, संजय राठोड, आमदार भरत गोगावले, माजी मंत्री दीपक सावंत, आमदार संजय गायकवाड, संजय शिरसाट, शहाजी बापू पाटील, मनिषा कायंदे, नरेश म्हस्के, ज्योती वाघमारे, राहुल लोंढे, कृपाल टुमणे, आशिष जैस्वाल, किरण पांडव, या नेत्यांच्या नावाचीही नोंद या यादीत करण्यात आलीय.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com