IPL 2024 : हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द; काय आहे प्ले ऑफचं समीकरण? 'हा' संघ मारणार बाजी
IPL 2024 Playoffs : इंडियन प्रीमियर लीगला सनरायजर्स हैदराबादच्या रुपात तिसरी प्ले ऑफ क्वालिफाईड टीम मिळाली आहे. पावसामुळे हैदराबाद आणि गुजरातचा कालचा सामना रद्द झाला. त्यामुळे एसआरएचचा संघ १३ सामन्यांमध्ये १५ अंकांवर पोहोचला आहे. त्यामुळे असं स्पष्ट झालं आहे की, केकेआर (१३ सामन्यांमध्ये १९ अंक), राजस्थान रॉयल्स (१३ सामन्यांमध्ये १६ अंक) या संघांसोबत टॉप-४ मध्ये एसआरएचचा संघही असेल. कारण हैदराबादचा आणखी एक सामना पंजाब किंग्जविरोधात रविवारी होणार आहे. प्ले ऑफसाठी तीन जागा निश्चित झाल्यानंतर चौथ्या जागेसाठी आता तीन संघांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, लखनऊ सुपर जायंट्स, या तीघांमध्ये रंगतदार सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात होणार आहे.
चार संघांचं 'असं' आहे समीकरण
चेन्नई सुपर किंग्ज (१३ सामन्यांमध्ये १४ गुण, एनआरआर +0.528)
ऋतुराज गायकवाडचा सीएसके संघ प्ले ऑफच्या चौथ्या स्थानावर कब्जा करण्यासाठी सर्वात चांगल्या स्थितीत आहे. शनिवारी आरसीबीविरोधात होणाऱ्या सामन्यात सीएसकेनं विजय मिळवल्यास, त्यांना गुणतालिकेत बढती मिळेल. जर आरआर आणि एसआरएस क्रमश: केकेआर आणि पंजाब किंग्जविरोधात त्यांचा शेवटचा सामना हरल्यास सीएसकेला प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मिळेल. फक्त त्यांच्याकडे चांगला नेटरनरेट असला पाहिजे. आरसीबीनं पराभूत केल्यानंतरही ते पुढे जाऊ शकतात. पण पराभव मोठ्या फरकाने होऊ नये, याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. यामुळे त्यांचा एनआरआर आरसीबीपेक्षा चांगला होईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (१३ सामन्यांमध्ये १२ गुण, एनआरआर +0.387)
उर्वरीत सामना - १ विरुद्ध सीएसके
फाफ डुप्लेसिसच्या आरसीबी संघाला प्ले ऑफ मध्ये जागा बनवण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. पण त्यांना धावांच्या मोठ्या फरकानं जिंकावं लागेल.
लखनऊ सुपर जायंट्स (१३ सामन्यांमध्ये १२ गुण, एनआरआर - 0.787)
उर्वरीत सामना - १ विरुद्ध मुंबई इंडियन्स
के एल राहुलच्या लखनऊच्या संघाला एका असंभव स्थितीचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी होणाऱ्या शेवटच्या सामन्यात त्यांनी धावांच्या खूप मोठ्या फरकानं जिंकावं, हीच एक आशा त्यांना प्ले ऑफमध्ये क्लालिफाय करण्यासाठी आहे. जर सीएसकेनं आरसीबीला मोठ्या फरकानं पराभूत केलं नाही, तर तिन्ही संघ १४ गुणांवर राहतील. त्यानंतर नेटरनरेटनुसार या संघांबाबत निर्णय घोषित केला जाईल.
दिल्ली कॅपिटल्स (१४ सामन्यांमध्ये १४ गुण, -0.377)
उर्वरीत सामना - 0
दिल्लीचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. कारण रनरेट सुधारण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच सामना बाकी राहिला नाही.