K L Rahul
K L Rahul

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

टी- २० वर्ल्डकपसाठी वसीम जाफरने निवडलेल्या भारतीय संघात या दिग्गज खेळाडूंना मिळाली संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती.
Published by :

माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफरने आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ साठी भारतीय संघाची निवड केली आहे. जाफरने त्याच्या संघात विकेटकीपर म्हणून के एल राहुलची निवड केली नाहीय. जाफरने संजू सॅमसन आणि रिषभ पंतचा टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात समावेश केला आहे. जाणून घेऊयात वसीम जाफरने निवडलेल्या भारतीय संघाबाबत सविस्तर माहिती.

वसीम जाफरच्या भारतीय संघात रोहित शर्मा ऐवजी यशस्वी जैस्वालची सलामीवीर फलंदाज म्हणून निवड केली आहे. जाफरने त्याच्या संघात शुबमन गिललाही संधी दिली नाहीय. तर विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंगचा या संघात समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि शिवम दुबेची निवड करण्यात आलीय. दुबेनं यंदाच्या आयपीएल हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वसीम जाफरने विकेटकीपरसाठी संजू सॅमसन आणि रिषभ पंतची निवड केली आहे. के एल राहुलचा या संघात पत्ता कट करण्यात आला आहे. जाफरने दोन स्वेशलिस्ट स्पिनर्स कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलचीही निवड केली आहे. याशिवाय वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगची निवड केली आहे.

टी- २० वर्ल्डकपसाठी वसीम जाफरने निवडलेला भारतीय संघ

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, रिषभ पंत, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीर सिंग.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com