International Yoga Day 2025 : योगशास्त्राची प्राचीन परंपरा आणि त्याचे आधुनिक महत्त्व, जाणून घ्या..
21 जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी साजरा केला जातो. योग हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग मानला जातो. याचे मूळ प्राचीन भारतातील ऋषीमुनींच्या काळात शोधले जाते. अनेक लोकांना योग म्हणजे केवळ योगासने आणि प्राणायाम असे वाटते. मात्र, ‘योगशास्त्र’ ही संकल्पना शरीर, मन आणि आत्मा यांचं एकात्म साधणाऱ्या आध्यात्मिक शिस्तीचं व्यापक स्वरूप आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, पारंपरिक योगाचे विविध प्रकार आणि त्यांचे महत्त्व जाणून घेऊया.
आंतरराष्ट्रीय योग दिनाची 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत (UNGA) 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव संमतीने मंजूर झाला आणि 2015 पासून योग दिन साजरा होऊ लागला. योगाची सुरुवात भगवान शिव यांच्यापासून झाल्याचे मानले जाते. त्यांना आदियोगी आणि आदिगुरु असेही संबोधले जाते. पुराणांनुसार, त्यांनी सप्तऋषींना योगाचे ज्ञान दिले आणि त्यांनी ते जगभर पसरवले.
योगाचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व
आजच्या काळात योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम असा समज आहे, मात्र पारंपरिक योग विविध आध्यात्मिक व तात्त्विक प्रकारांनी समृद्ध आहे.
1. हठ योग
योगाचा सर्वात जुना आणि मूलभूत प्रकार आहे. मुख्यतः शरीरशुद्धी व आत्मशिस्तीवर
सात अंग: शटकर्म (शुद्धी क्रिया), आसन, मुद्रा, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि समाधी
हठयोगाच्या साधनेतून कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि चक्रांचे संतुलन होते.
2. 'राजमार्ग' किंवा 'श्रेष्ठ मार्ग' म्हणून ओळखला जातो
आठ अंगांमुळे याला अष्टांग योग म्हणतात: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी
शिस्त, मन:संयम आणि ध्यान यावर विशेष भर
आत्मसाक्षात्कारासाठी सर्वोत्तम मार्ग मानला जातो.
3. कर्म योग
निष्काम कर्माचा मार्ग
फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणे हे या योगाचे सूत्र
भगवद्गीता मध्ये कर्मयोगाचे व्यापक वर्णन
मनशांती आणि सेवा वृत्तीचा विकास
4. भक्ती योग
श्रद्धा व भक्तीचा मार्ग
श्रवण, कीर्तन, स्मरण, पदसेवा, अर्चना, वंदन, दास्य, सख्या, आत्मनिवेदन — ही नवविधा भक्ती
भावनिक स्थैर्य, सहिष्णुता, क्षमा आणि प्रेमाची भावना यांचा विकास
5. ज्ञान योग
तत्त्वज्ञान आणि शुद्ध ज्ञानाचा मार्ग
आत्मशोध, शास्त्रांचा अभ्यास, वास्तव-अवास्तवातील भेद ओळखणे
तीन तत्त्वांवर आधारित: आत्मसाक्षात्कार, अहंकाराचे निर्मूलन आणि अंतिम सत्याचे ज्ञान
बुध्दिप्रामाण्य आणि विवेकावर आधारित आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग