अर्थसंकल्पानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाणून घ्या काय आहेत?

अर्थसंकल्पानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाणून घ्या काय आहेत?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल अर्थसंकल्प सादर केला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पानंतर आज 2 फेब्रुवारी 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ झाली आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बऱ्याच काळापासून कोणताही मोठा बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

देशांतील पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल डिझेल

मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये

दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये

कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये

चेन्नई 102.63 रुपये 94.24 रुपये

राज्यात कोणत्या शहरात किती दर?

पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर

नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर

पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com