Kojagiri Purnima 2025
Kojagiri Purnima 2025

Kojagiri Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा

कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

Kojagiri Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात अत्यंत महत्व आहे. ही पौर्णिमा शरीर, मन आणि धनासाठी उत्तम आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र 16 कलांनी भरलेला असतो जो आपल्या किरणांमधून अमृताचा वर्षाव करतो. यंदा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना खास शुभेच्छा द्या.

रुपेरी चांदण्यांनी तुमचं आयुष्य उजळून निघो. कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करू या सण कोजागिरीचा…

कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…

कोजागिरीचे चांदणे, हसतंय माझ्या अंगणात, दुग्धशर्करा योग यावा, जसा साऱ्यांचा जीवनात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमेच्या तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com