कोल्हापुरात पंचगंगेत पोतं भरुन आधार कार्ड सापडल्याने खळबळ!
Admin

कोल्हापुरात पंचगंगेत पोतं भरुन आधार कार्ड सापडल्याने खळबळ!

पंचगंगा नदी पात्रात स्वच्छता करत असताना राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना हे पोतं तरंगताना दिसल्याने बाहेर काढले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पंचगंगा नदी पात्रात स्वच्छता करत असताना राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांना हे पोतं तरंगताना दिसल्याने बाहेर काढले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नदीत सापडल्याने चर्चा सुरु झाली आहे. शासकीय योजनांसाठी महत्वाचा दस्तावेज असलेल्या आधार कार्ड आणि रेशनकार्डचा गैरवापर किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

आधार कार्डवरील बहुतांश नागरिकांचे वय साधारण 60 ते 65 वयापर्यंत आहे. त्यामुळे पेन्शन मंजुरीच्या हेतूने आधार कार्डवर वय वाढवण्याचे प्रकारही सुरु आहेत. या प्रकरणाची माहिती शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात सापडलेली सर्व आधार कार्ड इचलकरंजी शहर आणि परिसरातील असल्याचे समजते.

आधार कार्डवरुन काहींना संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी ती आपल्याकडेच सांगितले. दरम्यान, आधार कार्ड तयार करण्याची काही नावे समोर आली असून पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com