Prashant Koratkar Update : प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर न्यायालयाकडून दिलासा, पोलिसांची विनंती कोर्टाने फेटाळली
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. जातीय तेढ,धार्मिक भावना,महापुरुषांचा अवमान आशा एकूण सहा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या अगोदर प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मिळाला होता. याचपार्श्वभूमिवर कोरटकरांच्या जामिनावर कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश क्रमांक- २ डी.व्ही. कश्यप यांच्या समोर सुनावणी झाली आहे. यादरम्यान तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे ,पोलिस उपनिरीक्षक गळवे यांच्यासोबत सरकारी वकील विवेक शुक्ल कोर्ट रूम मध्ये हजर होते. प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे.
प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रशांत कोरटकर याला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत आवश्यकता नसल्याचे कोर्टाच निरीक्षण १७ मार्च पासून दररोज सुनावणी होणार आहे. तसेच जो डेटा इरेज करण्यात आला आहे, तो डेटा मिळवण्यासाठी प्रशांत कोरटकर आवश्यक आहे, असं पोलिसांनी म्हटलं होतं. मात्र, पोलिसांचं म्हणणं फेटाळून लावण्यात आलं आहे.