Admin
बातम्या
Kolhapur Jyotiba Yatra : सासनकाट्या नाचू लागल्या... गुलालाची उधळण झाली; दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला सुरुवात
दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे.
दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे मानाच्या सासनकाठ्या. जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक या यात्रेत सामील होतात. मंदिर परिसर, पार्किंग व डोंगर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार असल्याने पोलिस, होमगार्ड, स्वयंसेवकांसह खासगी सिक्युरिटी गार्डची सोय केली आहे.
यावेळी सासन काठ्या नाचवल्या जातात, गुलालाची उधळण केली जाते. या यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येत असतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी आणि पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. चांगभलंच्या गजरात मानाच्या सर्व सासनकाठ्या आणि भाविकांनी जोतिबा डोंगरावर हजेरी लावली आहे. पाच एप्रिल हा या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे. या निमित्त लाखो भाविक या यात्रेसाठी येत असतात.