करवीर निवासिनी अंबाबाईचं गाभाऱ्यातील दर्शन आज बंद राहणार
सतेज औंधकर, कोल्हापूर
नवरात्र उत्सवाला येत्या 3 तारखेपासून सुरुवात होत आहे. आई अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाईचं गाभाऱ्यातील दर्शन आज बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. गाभाऱ्याच्या स्वच्छतेसाठी भाविकांना आज गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त स्वच्छतेला सुरूवात केली आहे. मंदिर दिवसभर खुले राहणार आहे मात्र गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे.
सकाळी नऊ वाजता पासून स्वच्छतेला प्रारंभ झाला असून वीस पेक्षा अधिक पुजारी आणि देवस्थान समितीचे कर्मचारी या संपूर्ण गाभाऱ्याची स्वच्छता करत आहेत.
यापार्श्वभूमीवर मंदिर परिसराच्या स्वच्छतेबरोबरच दागिन्याच्या स्वच्छतेलाही आज सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून दागिन्यांची स्वच्छता केली जात आहे.