कोल्हापूरात पाण्याचा ठणठणाट; नागरिकांचे हॉकी स्टेडियम चौकात रास्तारोको आंदोलन
Admin

कोल्हापूरात पाण्याचा ठणठणाट; नागरिकांचे हॉकी स्टेडियम चौकात रास्तारोको आंदोलन

कोल्हापूरात पाण्याचा ठणठणाट; नागरिकांचे हॉकी स्टेडियम चौकात रास्तारोको आंदोलन

कोल्हापूरातील माढा कॉलनी, शाहू कॉलनी, बालाजी पार्क, गुरु महाराज नगरी, स्वामी समर्थ अपार्टमेंट, आदी भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले आहे. पाण्याचा पूर्णतः ठणठणाट असल्याने आज संतप्त महिला आणि नागरिकांनी हॉकी स्टेडियम चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या महिनाभरापासून पाणी आलं नसल्याने महिलांनी रस्त्यावर टायर टाकून आणि घागरी हातामध्ये घेऊन आंदोलन केले.

महिला महापालिकेतील अधिकाऱ्यांवर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. जोपर्यंत आमच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार नाही, अशी भूमिका महिलांनी घेतली आहे. गेल्या महिन्याभरापासून आम्ही पाणी विकत घेत असून, आमचे हातावरचे पोट असल्याने आम्ही दररोज पाणी विकत घेऊन पिऊ शकत नाही, अशी भावना आंदोलन करणाऱ्या नागरिक आणि महिलांनी व्यक्त केली. जर आमच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर निवडणुकीला भागात येऊ देणार नाही, असे महिलांनी सांगितले.

जोपर्यंत महापालिका आयुक्त या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. असे संतप्त महिलांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com