Panchganga River : पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी; कोल्हापूरातील हा मार्ग बंद

Panchganga River : पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी; कोल्हापूरातील हा मार्ग बंद

राज्यात पावसाने जोरदार सुरुवात केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. सगळीकडे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळत आहे. यातच आता जोरदार पावसामुळे कोल्हापुरमधील पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने मध्यरात्री ३९ फुटांची इशारा पातळी गाठली आहे.

कोल्हापूरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळपासून कमी-अधिक फरकाने जिल्ह्यातील २४ पैकी १५ राज्य मार्ग आणि १२२ पैकी ५१ प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. रात्री उशिरा इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे.सर्वच धरणांमधील पाणीसाठ्यासह नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

८० बंधारे पाण्याखाली असून कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील मांडुकली व लोंघे येथे पाणी आल्यामुळे कोकणातील संपर्क तुटला आहे.गगनबावडा तालुक्यातील लोंघे, मांडुकली येथे पाणी आल्यामुळे या मार्गावरील गोवा, पणजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com