ताज्या बातम्या
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगा नदी पात्राबाहेर येण्यास सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
सतेज औंधकर, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पंचगंगा नदी आता पात्राबाहेर येण्यास सुरुवात झाली असून सध्या पंचगंगेची पाणीपातळी ही 26 फूट पाच इंचावर पोहोचली आहे.
21 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला आज असल्याने सकाळपासून देखील पावसानं दमदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे.
राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पंचगंगा नदी पात्रा बाहेर येण्यास सुरुवात झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.