ताज्या बातम्या
Kolhapur : कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी; पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
सतेज औंधकर, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. जोरदार पवासामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 33 फूट 10 इंचावर गेली आहे.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक चार, पाच आणि सहा उघडण्यात आले असून राधानगरीतून 5784 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रासह पश्चिम घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे 42 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडीवरून वाहू लागल्या आहेत.