Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; नद्यांच्या पाणी पातळीत होतंय घट

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; नद्यांच्या पाणी पातळीत होतंय घट

कोल्हापूर जिल्ह्यात गेली पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पात्रा बाहेरून वाहू लागलेली होती
Published by :
Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात गेली पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पात्रा बाहेरून वाहू लागलेली होती मात्र आता कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पात्राबाहेर गेलेली पंचगंगा नदी आता हळूहळू पात्रात येऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे.

पश्चिम घाट माथ्यावर ही पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळत असून परिणामी आता जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पाणी पातळीत घट होताना दिसून येते आहे. राधानगरी धरण हे 47.43% भरला असून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरूच आहे.

51 बंधारे पाण्याखाली गेले असून त्या बंधार्‍यावरून वाहतूक अद्यापही बंदच आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही गेल्या 24 तासात तुरळक पावसाची नोंद झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com