कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगेची संथ गतीनं इशारा पातळीकडे वाटचाल सुरू

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगेची संथ गतीनं इशारा पातळीकडे वाटचाल सुरू

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असलेला पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असलेला पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे 84 बंधारे पाण्याखाली गेली असल्याची माहिती मिळत असून पंचगंगेची संथ गतीनं इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे.

84 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगेची पाणीपातळी 38 फूट 08 इंचावर गेली आहे.

याच पार्श्वभूमीवर वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. सुतारवाड्यातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून 8 कुटुंबातील 28 लोकांचे रात्री सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. शहरातील पूर बाधित भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com