Sanjay Pawar | Eknath Shinde
Sanjay Pawar | Eknath Shindeteam lokshahi

CM शिंदेंविरोधात संजय पवार आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात

खऱ्या शिवसैनिकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
Published by  :
Shubham Tate

शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शिवसेनेने निदर्शने करणार असल्याची घोषणा केली होती. बंडखोर आमदार आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात येणार होती. ही निदर्शने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार होती. मात्र, त्यापूर्वीच शिवसैनिकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली. (Kolhapur Sanjay Pawar against CM Eknath Shinde)

Sanjay Pawar | Eknath Shinde
'द ग्रेट खली' मीडियासमोर रडले, व्हिडिओ व्हायरल

यावेळी पोलिसांनी काही शिवसैनिकांचीही धरपकड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या वेळी निदर्शने करणार असल्याची घोषणा कोल्हापूर शिवसेनेने केली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून संजय पवार यांना ताब्यात घेतले आहे.

Sanjay Pawar | Eknath Shinde
Men Health Tips : पुरुषांना एचआयव्ही झाल्यास ही लक्षण जाणवतात, याकडे करू नका दुर्लक्ष

पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं शिवसैनिकांना अटक केली आहे, शांततेच्या मार्गानं आंदोलन सुरु असताना कोणतीही नोटीस न देता पोलिसांनी संजय पवार आणि शिवसेना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप शिवसेसैनिकांनी केला आहे. खरंतर या खऱ्या शिवसैनिकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com