Kolkata
ताज्या बातम्या
Kolkata : कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार
कोलकाता पुन्हा एकदा हादरलं आहे.
( Kolkata ) कोलकाता पुन्हा एकदा हादरलं आहे. कोलकाताच्या लॉ कॉलेजमधील एका विद्यार्थिनीवर कॉलेजध्येच सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
या घटनेतील पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर 3 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांनी तिन्ही आरोपींचे मोबाईल फोनही जप्त केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेतील 3 आरोपींपैकी 1 आरोपी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याची माहिती समोर आली आहे.
याच्याआधी कोलकातामध्ये 9 ऑगस्ट 2024 रोजी आर जी कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.