RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय

RR vs KKR : केकेआरचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय

कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणे यानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणे यानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरनं राजस्थान रॉयल्सला 8 विकेट राखून पराभूत केलं आणि राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

राजस्थान रॉयल्सने कोलकाताला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने 17.3 ओव्हरमध्ये 153 धावा केल्या. रहाणे 15 बॉलमध्ये 18 रन्स करुन माघारी परतला. तर क्विंटन डी कॉक याने 64 चेंडूत 97 धावा केल्या.

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात पहिला विजय मिळवला आहे. राजस्थानने कोलकाताला गुवाहाटातील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये विजयासाठी 152 धावांचं जे आव्हान दिलं होतं ते केकेआरने 17.3 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com