बातम्या
कोकण कन्या एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं; प्रवाशांचे हाल
कोकण कन्या एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
कोकण कन्या एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. नांदगाव ते वैभववाडी रेल्वे स्टेशनदरम्यान बंद पडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तास विस्कळीत झाली आहे.
इंजिनामधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी अजूनही अर्धा ते एक तास लागणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. इंजिन बिघाडामुळे कोकण कन्या एक्स्प्रेस बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे.
कोकण कन्या एक्स्प्रेस मुंबईहून गोव्याकडे जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.