Kokan Railway
Kokan RailwayTeam Lokshahi

कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक लागू; वाचा संपूर्ण वेळापत्रक

रेल्वे गाड्यांचा वेग मंदावणार; एक ते दोन तास लवकर येणार
Published by :
Sagar Pradhan

निसार शेख|रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.  कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मुंबई ते कोकण दरम्यानची मेल-एक्सप्रेसची प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल 37 गाड्यांचा वेग आजपासून मंदावणार आहे. अतिवृष्टीत गाड्यांचा वेग 40 किमी प्रतितास राहणार असून गाड्या प्रत्येक स्थानकावर नियमित वेळापत्रकापेक्षा एक ते दोन तास लवकर येणार आहेत. हे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्‍टोबरसाठी लागू असेल.

मान्सून कालावधीसाठी रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक असे आहे.

मुंबई ते मंगळुरू : ही गाडी सीएसएमटी येथून रात्री 10.02 वाजता सुटून ठाण्यात 10.45 वाजता, रत्नागिरी पहाटे 4.10, कणकवली सकाळी 6.10, मडगावला 8.50 तर मंगळुरूला दुसऱया दिवशी दुपारी 3.40 वाजता पोहोचेल. परतीसाठी मंगळुरूहून सायंकाळी 4.35 वाजता सुटून मडगावला रात्री 10 वाजता, कणकवली 11.54, रत्नागिरी 2.25, ठाणे सकाळी 9.40 तर सीएसटीएमला सकाळी 10.35 वाजता पोहोचेल.

कोकणकन्या एक्स्प्रेस : मुंबई सीएसएमटी येथून रात्री 11.05 वाजता सुटेल. दादरला 11.20, ठाणे 11.50 रत्नागिरी 5.30, सिंधुदुर्ग 7.57, कुडाळ 8.10, सावंतवाडी 8.42 वाजता पोहोचेल. परतीसाठी मडगावहून सायंकाळी 6 वाजता सुटून सावंतवाडीला 7.30, कुडाळ 7.52, रत्नागिरी 10.55, ठाणे 4.42, सीएसटीएमला 5.40 वा. पोहोचेल.

सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेस : दादर येथून मध्यरात्री 12.05 वा. सुटून ठाण्याला 12.35, रत्नागिरीला सकाळी 7.50, वैभववाडी 9.30, कणकवली 10.16, सिंधुदुर्ग 10.38, कुडाळ 10.52 तर सावंतवाडीला 11.30 वा. पोहोचेल. परतीसाठी सायंकाळी 5.55 वाजता सुटून कुडाळ 6.14, सिंधुदुर्ग 6.26, कणकवली, वैभववाडी करत दादरला सकाळी 6.40 वाजता पोहोचेल.

तेजस एक्स्प्रेस : मुंबईहून 5.50 वा.पहाटे सुटून दादर 6.2, ठाणे 6.25, रत्नागिरी 11.55, कुडाळ 2.32, वाजता पोहोचेल. परतीसाठी मडगाव येथून दुपारी 12.25 वा. सुटून कुडाळला दुपारी 2.00 रत्नागिरी 5.25 दादरला 11.30 वा. पोहोचेल.

दिवा-सावंतवाडी : ही गाडी दिवा येथून सकाळी 6.25 वाजता सुटून रत्नागिरी येथे दुपारी 2 वाजता, वैभववाडी 3.55, कणकवली 4.34, कुडाळ 5.11 तर सावंतवाडीला 6.30 वा. पोहोचेल. परतीसाठी सकाळी सावंतवाडी येथून 8.15 वाजता सुटून कुडाळ 8.38, कणकवली 9.10, वैभववाडी 9.55, रत्नागिरी 12.5 तर दिवा रात्री 8.10 वा. पोहोचेल.

मांडवी एक्स्प्रेस : मुंबईतून सकाळी 7.10 वा. सुटून दादर 7.25, ठाणे 7.55,5 रत्नागिरी 2.40, वैभववाडी 4.58, कणकवली 5.32, कुडाळ 6.16, सावंतवाडी 7.02 मडगावला रात्री 9.45 वा पोहोचेल. मुंबईकडे जाताना मडगाव येथून सकाळी 8.30 वाजता सुटून ठाण्याला रात्री 8.37, तर दादरला 9.07 वा पोहोचेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com