Mumbai Metro 3 CarsTeam Lokshahi
ताज्या बातम्या
मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाच्या पहिल्या ट्रेनचे 4 डबे मुंबईत दाखल
Mumbai Metro 3 कुलाबा-वांद्रे-सीप्झ प्रकल्पाचे उर्वरित 4 डबे सुद्ध लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत.
मुंबई | संजय गडदे : मुंबईकरांसाठी खुशखबर! कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 (Mumbai Metro) मार्ग प्रकल्पाच्या पहिल्या ट्रेनचे पाहिले चार डबे मुंबईत आज पहाटे दाखल झाले आहेत. हे डबे चार ट्रेलर्सवर आंध्र प्रदेशातील श्रीसिटी पासून 1400 किमी अंतर 13 दिवसात ओलांडून मुंबई शहरात पोचलेले आहेत. तर उर्वरित चार डबे लवकरच मुंबईत पोहोचतील.
Mumbai Metro 3 CarsTeam Lokshahi
42 टन वजनाचा प्रत्येक डबा खास प्रकारच्या ट्रेलरवरून मुंबईपर्यंत आणण्यात आले आहेत. या 8-ऐक्सेल ट्रेलर्सना तब्बल 64 चाकं असतात. आता या डब्यांची जुळवणी करून सारिपूत नगरातील तात्पुरत्या सुविधेमध्ये एक ट्रेन थाटली जाईल. इथेच चाचणी ट्रॅकसुद्धा उपलब्ध आहे. तात्पुरत्या सुविधेपासून मरोळ नाका मेट्रो स्थनकापर्यंतच्या 3 कि. मी. लांबीच्या ट्रॅकवर चाचण्या घेण्यात येतील.