Kumbh Mela 2025: कुंभमेळ्यानंतर दिसेनासे होणारे नागा बाबा आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांचे जीवन
प्रयागराज येथे सोमवारपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली आहे. त्यापूर्वी श्री पंचायती आखाडा बडा उदासीनचे महंत आणि संतांनी महाकुंभात प्रवेश केला. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कालपासून कुंभ मेळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान महा कुंभाच्या वेळी त्रिवेणी घाटावर स्नान केल्याने मनुष्याला जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे आत्मा आणि शरीर दोन्ही शुद्ध होतात अशी मान्यता आहे. तर साधूंची मांदियाळी उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यासाठी देशविदेशांतून असंख्य साधुसंत आले असून, ते भाविकांच्या आकर्षणाचा विषय बनले आहेत.
कुंभमेळ्यातील नागा साधु कुठून आलेले असतात?
कुंभमेळ्यातील दोन सर्वात मोठे नागा साधूंचे आखाडे आहे. कुभमेळ्यात येणारे नागासाधु हे शरीर राख लावून आलेले असतात ज्यामुळे त्यांच शरीर झाकले जाते. महाकुंभमेळा आखाड्यातील बहुतेक नागा साधू हिमालय, काशी, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये राहतात. कुंभमेळ्यात प्रथम स्नान करण्याचा अधिकार नागा साधुंना दिला जातो. मात्र कुंभमेळ्याचा शेवटचा दिवस लोटल्यानंतर हे नागासाधु दिसेनासे होतात. हे आपापल्या गुढ दुनियेत परत जातात.
नागा साधु 'नागा' हे नाव का पडल?
नागा साधु यांच्या नावाचा अर्थ आहे विवस्त्र ईशान्य भारतात विवस्त्र राहणाऱ्या लोकांना नागा असे म्हटले जाते. हे नागा साधु त्यांच्या गुप्त ठिकाणी विवस्त्र राहून तपश्चर्या करतात. नागा साधुंचे काही कठोर नियम असतात ज्यात त्यांना त्यांची ओळख लपवावी लागते, तसेच नागा साधू झोपण्यासाठी पलंग, खाट किंवा इतर कोणतेही साधन वापरू शकत नाहीत. नागा साधू फक्त जमिनीवरच झोपतात.
नागा साधु कसे होतात?
जर एखाद्या तरुणाला नागा साधु बनायचं असेल तर त्यांना स्वत:चं श्राद्ध कराव लागतं. ज्यामुळे ते सांसारिक जीवनापासून पूर्णपणे अलिप्त होतात आणि सर्व प्रकारच्या इच्छांचा अंत होतो. त्यामुळे त्यांचे इंद्रियांवर नियंत्रण राहते तसेच त्यांचे जीवन आखाडे, संत परंपरा आणि समाजासाठी समर्पित होते. अनेक ठिकाण बदलत भोलेबाबांच्या भक्तीत तल्लीन झालेले नागा आपले संपूर्ण आयुष्य वनौषधी आणि कंदमुळांच्या साहाय्याने घालवतात. नागा साधू काही दिवस एका गुहेत राहतात आणि नंतर दुसऱ्या गुहेत जातात. त्यामुळे त्यांची नेमकी स्थिती शोधणे कठीण असते.