Kumbh Mela 2025: प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचा उत्साह, महाकुंभात आखाड्यांच्या अमृतस्नानाला प्रारंभ
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कालपासून कुंभ मेळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. काल कुंभ मेळ्यात दीड कोटी भाविकांनी शाहीस्नान करत मेळ्यात सहभाग नोंदवला आहे. तर आजपासून 13 आखाड्यांचं अमृत स्नान होणारा आहे.दरम्यान आजापासून भाविक 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करणार आहेत.
देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. एवढी गर्दी आहे की बरेच लोक वेगळे झाले आहेत. कुंभ स्नानासाठी परदेशी भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जर्मनी, ब्राझील, रशियासह 20 देशांतून भाविक दाखल झाले आहेत. दर तासाला २ लाख भाविक संगमात स्नान करतात. आजपासूनच भाविक 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करणार आहेत.
संगमाच्या सर्व प्रवेश मार्गांवर भाविकांची गर्दी आहे. वाहनांना प्रवेश बंद आहे. बस आणि रेल्वे स्थानकापासून 10-12 किलोमीटर पायी चालत भाविक संगम येथे पोहोचत आहेत. 60 हजार सैनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यात गुंतले आहेत. पोलिस स्पीकरवरून लाखोंच्या संख्येने गर्दीचे व्यवस्थापन करत आहेत. कमांडो आणि निमलष्करी दलाचे जवानही ठिकठिकाणी तैनात आहेत.