Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता लवकरच जमा होणार, बहीणींची संख्या मात्र घटली
महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजना या विषयावर खूप चर्चा सुरु आहे. लाडक्या बहीणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत 1500 रुपये खात्यात जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची सर्वच महिला आतुरतेने वाट बघत आहेत. आता या योजनेच्या अर्थवितरणासाठी अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता वितरित करण्यास उशीर झाला असं सांगण्यात आलं होतं.
मात्र आता लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावं वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष होते त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्यानं महिला लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. जानेवारी महिन्यात 5 लाख महिलांची संख्या घटली होती. त्यानंतर महिला व बाल विकास विभागानं केलेल्या पडताळणी प्रक्रियेत लाभार्थी महिलांची संख्या आणखी 4 लाखांनी घटल्याची माहिती आहे. त्यामुळं साधारणपणे 2 कोटी 37 लाख महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळतील.