'लाडकी बहीण'मुळे सरकारी तिजोरी रिकामी, कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
राज्यामध्ये 'लाडकी बहीण ही योजना' ही योजना निवडणुकांपासून खूपच चर्चेत राहिली आहे. या योजनेमुळे महायुती यश मिळाले असेही म्हंटले गेले. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक पात्र महिलेला 1500 रुपये मिळाले. मात्र ही योजना बंद होणार आशा अनेक चर्चादेखील सुरु झाल्या. अशातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे.
'लाडकी बहीण' या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याचे बोलले जात आहे . सर्व निधी 'लाडकी बहीण' या योजनेकडे वळवल्यामुळे सरकारचा खिसा रिकामा झाला आहे. यामुळे 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रखडला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 8 महिन्यांपासून महागाई भत्ता मिळाला नाही. त्यामुळे आता भत्ता न मिळाल्यास अधिवेशनादरम्यान कर्मचारी आंदोलन करणार आहेत.
राज्यात शासकीय-निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर नगर परिषद, जिल्हा परिषद, अधिकारी वर्ग असे मिळून तब्बल 17 लाख कर्मचारी आहेत. हे सर्व कर्मचारी मागील 8 महिन्यांपासून महागाई भत्त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.