Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या आनंदावर संक्रांत? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या आनंदावर संक्रांत? वाचा सविस्तर

Harshwardhan Sapkal on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकाच वेळी देण्याचा विचार असल्याची चर्चा होती. मकर संक्रांतीच्या निमित्ताने 14 जानेवारीला रक्कम जमा होईल असे संकेत होते.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Harshwardhan Sapkal on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकाच वेळी देण्याचा विचार असल्याची चर्चा होती. मकर संक्रांतीच्या निमित्ताने 14 जानेवारीला रक्कम जमा होईल असे संकेत होते. मात्र 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीचे मतदान असल्याने सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अशा निर्णयामुळे मतदारांवर परिणाम होऊ शकतो, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. निवडणूक झाल्यानंतरच निधी द्यावा, अशी मागणी करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पत्र दिले आहे.

या मुद्द्यावर भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर महिलांच्या योजनेला विरोध केल्याचा आरोप केला. सरकार संक्रांतीला महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करत असताना काँग्रेस अडथळे आणत असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, काँग्रेसने स्पष्ट केले आहे की योजनेला विरोध नाही, मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना प्रभावित करण्याचा प्रयत्न होऊ नये, एवढीच भूमिका आहे. निवडणुकीनंतर हप्ता देण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे.

थोडक्यात

• लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर व जानेवारीचे हप्ते एकत्र देण्याची चर्चा सुरू होती
• मकर संक्रांतीनिमित्त 14 जानेवारीला रक्कम जमा होईल असे संकेत दिले जात होते
• मात्र 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीचे मतदान होणार आहे
• त्यामुळे सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे
• या काळात निधी वाटप केल्यास मतदारांवर परिणाम होऊ शकतो, असा काँग्रेसचा आक्षेप
• निवडणूक झाल्यानंतरच हप्ता द्यावा, अशी काँग्रेसची मागणी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com