Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीचे 1500 आले, मार्चचा हप्ता कधी ? आदिती तटकरेंनी सांगितले...
लाडकी बहीण योजनेवरुन अनेक चर्चा सुरु आहेत. यातच लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील हप्ता कधी येणार? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यात आता फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळाले.
8 मार्चला म्हणजेच महिला दिनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र महिल्यांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? यावर आता चर्चा सुरु झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता आदिती तटकरे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे.
ही प्रक्रिया दिनांक १२ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये व मार्च महिन्याचे १५०० रुपये असे दोन टप्प्यात एकूण ३००० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे !