लाडकी बहीण योजनेवर सरकारचे निर्बंध ; नवीन अपडेट्स आल्या समोर

अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना आता लाभ मिळणार नाही.
Published by :
Prachi Nate

सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळत आहे. पण आता ही योजना बंद पडण्याच्या शक्यतादेखील व्यक्त केल्या जात आहेत. लाडकी बहीण या योजनेमध्ये बदल करणार असल्याचा निर्णय राज्य सरकारणे मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये घेतल्याच्या सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी जून महिन्यात दरम्यान ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यामध्ये आता यामुळे लाभार्थींची पडताळणी करणार असल्याचे सांगितले आहे. प्राप्तिकर विभागाकडून आयकर दाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यातून अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेतील 5 अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही. काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वत:हून योजनेचा लाभ घेणे बंद केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com