Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती; काही महिने लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांत लाडक्या बहिणीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार नाही. काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार आहेत. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची लोकप्रिय योजना आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र आता काही 'लाडकी बहीण योजना' अंतर्गत महिलांना मिळणाऱ्या पैशांना तात्पुरती स्थगिती लागणार आहे.
यामगचं कारण असं की, काल पार पडलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेच्या काटेकोर पालनामुळे हे पैसे सध्या थांबवले जातील. आचारसंहितेच्या नियमांनुसार, कोणताही पक्ष आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजना, बैठका, सभा इत्यादी राबवू शकत नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर असे सर्व मनाई आदेश तात्काळ लागू होतात.
केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तारुढ पक्षांनी विविध कल्याणकारी योजना, सवलतींची घोषणा करून किंवा सार्वजनिक निधीतून मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे शासनाच्या कामगिरीचा ठळकपणे प्रचार करून कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला चालना देण्यासाठी अधिकाराचा दुरुपयोग करता येणार नाही. तरी असं काही केल्यास आचारसंहितेचे नियम भंग होऊन कठोर कारवाई होऊ शकते.
त्यामुळे लाडकी बहीण योजना ही सरकारची शासकीय योजना असल्यामुळे ती आचारसंहिता लागू असेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र, निवडणूक संपल्यानंतर आणि नवे प्रशासन स्थिर झाल्यानंतर पुन्हा लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान काल झालेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार 2 डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल आणि मतमोजनी 3 डिसेंबरला केली जाणार आहे.

