Pune Protest : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर लहुजी सेनेकडून निषेध आंदोलन सुरु
पुण्यातीली गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढून लहुजी सेनेकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात येत आहे. लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर शेण आणि बांगड्या टाकून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान या आंदोलकांना खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरु असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेने आपला जीव गमावल्याची बातमी समोर आली. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या उपचारासाठी तिच्या कुटुंबाकडे दहा लाखांची मागणी केली होती. मात्र, महिलेचे कुटुंब तेवढी रक्कम देऊ शकले नाही. त्यामुळे तिचे कुटुंबीय हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असून देखील महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही. शेवटी त्या महिलेला इतर रुग्णालयात हलवत असताना त्या महिलेला त्रास झाला. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र, तिचा दुर्दैवी अंत झाला. या सगळ्या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.