लखीमपूर प्रकरणः आशिष मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
Admin

लखीमपूर प्रकरणः आशिष मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयाने अटींसह अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला सर्वोच्च न्यायालयाने अटींसह अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सध्या आशिषला 8 आठवड्यांसाठी सोडण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. परंतु अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द होऊ शकतो. आशिषला सुटकेच्या आठवड्याभरात उत्तर प्रदेश सोडावे लागणार आहे. तो सध्या दिल्लीत राहू शकत नाही.

14 मार्च रोजी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्या दिवशी आज दिलेल्या आदेशाचा आढावा घेतला जाईल. यासोबतच सुप्रीम कोर्टाने हत्येचा आरोप असलेल्या चार शेतकऱ्यांना अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेशही दिले आहेत.

लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना थार गाडीखाली चिरडण्यात आल्याची घटना घडली होती. यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतक पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com