Lalbaugcha Raja 2022
Lalbaugcha Raja 2022Team Lokshahi

Lalbaugcha Raja 2022: लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या वस्तूंचा आज लिलाव

गणेशभक्त मोठ्या आनंदाने बडी किंमत मोजून या लिलावातून आपल्या घरी घेऊन जात असतात.

लालबागचा राजा हा गणेशभक्तांसाठी अतिशय जवळचा विषय आहे. लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सर्व ऐवजांचा दरवर्षी लिलाव केला जातो. या सर्व गोष्टी गणेशभक्त मोठ्या आनंदाने बडी किंमत मोजून या लिलावातून आपल्या घरी घेऊन जात असतात. यंदा या सर्व गोष्टींचा लिलाव आज होणार आहे.

लालबागच्या राजाच्या चरणी यंदाच्या वर्षी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव आज दिनांक 15-09-2022 रोजी होणार आहे. यंदा राजाच्या चरणी मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीच्या वस्तूंचं दान आलं आहे. आज संध्या. 5 ते रात्री 10 पर्यंत या लिलावाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाविकांनी मोठ्या संख्येनं या लिलावात सहभागी होण्याचं आवाहन मंडळानं केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com