लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालेल्या वस्तूंचा लिलाव संपन्न; पाहा कोणकोणत्या वस्तूंची विक्री

लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालेल्या वस्तूंचा लिलाव संपन्न; पाहा कोणकोणत्या वस्तूंची विक्री

नवसाला पावणार लालबागचा राजा. लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सर्व ऐवजांचा दरवर्षी लिलाव केला जातो. या सर्व गोष्टी गणेशभक्त मोठ्या आनंदाने बडी किंमत मोजून या लिलावातून आपल्या घरी घेऊन जात असतात. यंदा या सर्व गोष्टींचा लिलाव काल गुरुवारी (15 सप्टेंबर) पार पडला.

नवसाला पावणार लालबागचा राजा. लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सर्व ऐवजांचा दरवर्षी लिलाव केला जातो. या सर्व गोष्टी गणेशभक्त मोठ्या आनंदाने बडी किंमत मोजून या लिलावातून आपल्या घरी घेऊन जात असतात. यंदा या सर्व गोष्टींचा लिलाव काल गुरुवारी (15 सप्टेंबर) पार पडला. यंदा राजाच्या चरणी मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीच्या वस्तूंचं दान आलं आहे. काल (15 सप्टेंबर) संध्या. 5 ते रात्री 10 पर्यंत या लिलावाचं आयोजन करण्यात आलं होते. भाविकांनी मोठ्या संख्येनं या लिलावात सहभागी झाले.

या लिलावात सोन्याचा मोदक सव्वा किलोचा होता, त्यासाठी 60 लाख 3 हजार रुपयांची बोली लावत एका महिलेने घेतला. यासोबतच या लिलावात यंदा 14 किलो 433 ग्रॅम चांदी आणि 3 किलो 673 ग्रॅम सोन्याच्या वस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये मोदक, हार, फूल, मूर्ती, गदा, चैन अशा सोन्या-चांदीच्या वस्तूंचा समावेश होता. तसेच एक किलोपेक्षा जास्त वजनाची लालबागचा राजाची मूर्ती, ज्यावर हिरा लावलेला होता. याशिवाय एक किलो वजनाचं सोन्याचं चॉकलेट, आणि सोन्याच्या बिस्कीटाचा देखिल लिलाव करण्यात आला. हार साडे सतरा तोळ्याचा होता, साडे आठ लाख रुपये किमतीला एका भक्ताने तो विकत घेतला. तसेच एक दुचाकी होती ती 66 हजार बोली लावून एका भक्ताने विकत घेतली.

Lokshahi
www.lokshahi.com