लालबागचा राजाच्या नवसाची आणि मुखदर्शनाची रांग कधी बंद होणार?

लालबागचा राजाच्या नवसाची आणि मुखदर्शनाची रांग कधी बंद होणार?

कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. यामुळेच लालबागचा राजा हा मुंबईसह देशविदेशातील करोडो गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोरोनाच्या तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. यामुळेच लालबागचा राजा हा मुंबईसह देशविदेशातील करोडो गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी पहायला मिळत आहे. लाखो भाविकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

राजकीय नेते मंडळी तसेच अनेक सेलिब्रिटींनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेते मंडळी तसेच अनेक सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले होते. मात्र, अनंत चतुर्थीला अवघे दोन दिवस उरले त्यामुळे लालबागचा राजा दर्शन मिळावं यासाठी अजूनही मोठी गर्दी पहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुमारे दोन ते दीड ते दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.

लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजता बंद होणार आहे. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची रांग उद्या रात्री 12 वाजता बंद होणार आहे. लालबागच्या राजाच्या मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com