Lalbaug Raja Mandal: पुरग्रस्तांना बाप्पा पावला! लालबागचा राजा मंडळाने घेतला 'हा' मोठा निर्णय
थोडक्यात
लालबाग मंडळाकडून 50 लाख मदत.
शिक्षक-नेत्यांचा पगार शेतकऱ्यांसाठी.
समाज-कलाकार मदतीसाठी पुढे.
Lalbaugcha Raja Mandal's big decision to help flood victims: सध्या राज्यात पावसाने थैमान घातलेले पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास जाणू काही पावसाने हिरावून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. गावागावांमध्ये पावासाचे पाणी तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने गावकऱ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी आता राज्यातून मदत केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री तसेच अनेक नेत्यांनी आपला एक दिवसांचा पगार देण्याचा विचार केला आहे. त्यामध्ये आता लालबागचा राजा मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर केलेली आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते म्हणून मंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल 50 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे. ज्यामुळे पूरग्रस्तांच्या खाण्यापिण्याची सोय केली जाईल.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके, जनावरं आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2215 कोटींची मदत जाहीर केली. त्यासोबतच सर्व आमदार-खासदार आपले एका महिन्याचे वेतन, तर सरकारी कर्मचारी आणि शिक्षक एका दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसेंनी माध्यमांना दिली.
सोलापूर जिल्ह्यामधील पारलिंगी समुदायानेही मदतीचा हात पुढे केला असून, जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे. दरम्यान, अभिनेता प्रवीण तरडे आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. समाजातील विविध घटक एकत्र येऊन बळीराजाच्या संकट काळात आधार बनलेल आहेत.