Monsoon Updates : कल्याणमध्ये मूसळधार पावसामुळे दरड कोसळली

Monsoon Updates : कल्याणमध्ये मूसळधार पावसामुळे दरड कोसळली

राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.
Published by :
Sudhir Kakde

कल्याण : आज दिवसभरापासून कोसळत असलेल्या जोरदार मूसळधार पावसामुळे कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग समितीच्या मागच्या बाजूला असलेल्या हनुमाननगर नजीकचा टेकडीवरुन दरड कोसळल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली. या घटनेत जीवित हानी झालेली नाही. मात्र घटनास्थळी महापालिकेच्या प्रभाग अधिका:यांसह आपतकालीन पथकाने धाव घेतली आहे. (Landslide in Kalyan due to Heavy Rain)

केडीएमसीच्या ज( ब) प्रभाग अंतर्गत येणाऱ्या हनुमान नगरला लागून ही टेकडी आहे. पावसामुळे टेकडीचा काही भाग कोसळला. तो खाली आला. या घटनेत हनुमानगरातील एकाही व्यक्तीला इजा झालेली नाही. मात्र घटनास्थळी प्रभाग अधिकारी हेमा मुंबरकर यांनी धाव घेतली. घटना घडलेल्या परिसरातील पाच कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या कुटुंबियांना राधा कृष्ण मंदिराच्या हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या जेवण पाण्याची व्यवस्था महापालिकेकडून उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती प्रभाग अधिकारी मुंबरकर यांनी दिली आहे.

Monsoon Updates : कल्याणमध्ये मूसळधार पावसामुळे दरड कोसळली
राज्यात अनेक ठिकाणी कोसळधारा; कोल्हापुरात पर्यटक अडकले

कल्याण डोंबिवलीत कचोरे, नेतीवली हा परिसर टेकडीचा आहे. तसेच गोदरेज हिल्स परिसरहा हा उंच सखळ आहे. पावसाचा जोर वाढत आहे. या टेकडीवजा असलेल्या उंच सखल भागात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची कोणताही घटना घडल्यास नागरीकांनी तातडीने मदतीसाठी महापालिका, पोलिस आणि अग्नीशमन दलाशी संपर्क साधावा. त्यांच्याकरीता मदत कार्य उपलब्ध करुन दिले जाईल असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com