लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक; पाण्याचा टाकीवर चढत आंदोलन

कांद्याच्या दरासाठी शोले स्टाईल आंदोलन
Published by :
Siddhi Naringrekar

केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले 20 टक्के निर्यात शुल्क तातडीने कमी करावे या मागणीसाठी नाशिकच्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर 10 ते 20 शेतकऱ्यांनी चढून हे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामुळे काही काळ लिलाव ठप्प झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com