जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी आलेल्या कर्मचाऱ्याची अखेरची 'एक्झिट'

जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी आलेल्या कर्मचाऱ्याची अखेरची 'एक्झिट'

पुरवठा निरिक्षक प्रकाश पांडुरंग खांडेकर यांचा दुर्दैवी मृत्यू

निसार शेख|रत्नागिरी: जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्चीवर बसलेले कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. गुहागर येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरिक्षक प्रकाश पांडुरंग खांडेकर वय वर्षे 54 रा. मुंढरे गुहागर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयातील महसूल शाखेत खुर्चीवर बसलेले असतानाच बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. आज सकाळी गुहागर येथुन कार्यालयीन कामासाठी गुहागर तहसील कार्यालयातील पुरवठा निरिक्षक प्रकाश खांडेकर आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. वय वर्षे 54 असलेले प्रकाश खांडेकर हे २०२५साली निवृत्त होणार होते. कार्यलयीन कामासाठी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेत आले होते. अचानक चक्कर आल्या सारखे होऊन ते खुर्चीतच बेशुद्ध पडले.त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले आहे.शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलेले असताना ते हृदय विकाराच्या झटक्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी कामानिमित्त बाहेर गेलेले खांडेकर आता  माणूस घरी व तहसीलदार कार्यालयात कधीच परतणार नाहीत या आठवणीनेच अनेकांनी दुःख व्यक्त केल आहे.

सरकारी नोकरीला लागण्यापूर्वी खांडेकर हे मिल्ट्रीमध्ये होते. गुहागर तहसील कार्यालयात अनेक जागा रिक्त असून सगळा भार हा पुरवठा निरिक्षक असलेल्या प्रकाश खांडेकर यांच्या वर पडत होता अगोदर ते खेड मध्येही पुरवठा शाखेत होते. अत्यंत साध व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. दोन महिन्या पूर्वीच ते आपल्या गावात गुहागर ला हजर झाले होते.त्याच्या पश्यात आई,पत्नी व दोन मुले असा मोठा परिवार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com