PM मोदींनी दिली लता दीदींना जयंतीच्या दिवशी अनोखी भेट; अयोध्येतील चौकाला देणार लता दीदींचे नाव
Admin

PM मोदींनी दिली लता दीदींना जयंतीच्या दिवशी अनोखी भेट; अयोध्येतील चौकाला देणार लता दीदींचे नाव

आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंती दिनी अभिवादन केले आहे.

आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंती दिनी अभिवादन केले आहे. आज याच पार्श्वभूमीवर, त्यांनी अयोध्येमधील चौकाला लता दीदींचे नाव दिले जाणार असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या जयंती ट्विट केले. त्यांनी लिहिले की, लतादीदींना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. मला खूप काही आठवतंय…असंख्य संभाषणे ज्यात त्यांनी खूप आपुलकीचा वर्षाव केला. आज अयोध्येतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येत आहे, याचा मला आनंद आहे. महान भारतीय व्यक्तिमत्वाला खरी श्रद्धांजली आहे.

लता मंगेशकर यांचा जन्म 1929 मध्ये झाला. त्यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी, उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील एका मोठ्या चौकात 14 टन आणि 40 फूट वीणा पुतळा बसवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी आज या चौकाचे उद्घाटन करणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय पर्यटन मंत्री या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com