Latur: शेतीच्या वादातून काकाची पुतण्याला मारहाण, उपचारादरम्यान पुतण्याचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून काकानेच पुतण्याला मारहाण करून त्यात पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील महोदळ याठिकाणी शेतीच्या वादातून काकानेच पुतण्याच्या डोक्यात काठीने वार केल्याने उपचारादरम्यान पुतण्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मोहदळ येथील चंद्रकांत निकम व सूर्यकांत निकम या दोन भावांच्या कुटुंबीयात शेतीचा वाद आहे.
18 ऑक्टोबर रोजी पेरणीसाठी शेतात ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून या दोन्ही कुटुंबात किरकोळ वाद झाला होता. शेतीच्या किरकोळ कारणावरून काकाने पुतण्याच्या डोक्यात काठी घालून वार केले आणी त्यामध्ये पुतण्याला जखमी केले. अर्जुन निकम असं या तरुणाचे नाव असून, उपचारांसाठी अर्जुन निकम याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले होते.
मात्र 40 दिवसानंतर उपचारादरम्यान अर्जुनचा मृत्यू झाला आहे. नातेवाइकांनी मृतदेह चाकूर पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवून आक्रोश केल्यानंतर या प्रकरणी काकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काकावर खुनाचा गुन्हा दाखल होताच नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.