Swanandi Berde Laxmikant Berde's Daughter : लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक आता व्यावसायिका; 'या' ज्वेलरी ब्रँडची घोषणा

Swanandi Berde Laxmikant Berde's Daughter : लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक आता व्यावसायिका; 'या' ज्वेलरी ब्रँडची घोषणा

लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे हिने कांताप्रिया ज्वेलरी ब्रँडची घोषणा केली आहे आणि उद्योजकतेच्या मार्गावर पाऊल ठेवले आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे हिने आता अभिनय क्षेत्राबरोबरच उद्योजकतेच्या वाटेवरही पाऊल ठेवले आहे. नुकत्याच इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने आपल्या नव्या ज्वेलरी ब्रँडची घोषणा केली असून चाहत्यांसोबत ही आनंदवार्ता शेअर केली आहे.

स्वानंदीच्या या ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे – ‘कांतप्रिया’. या नावामागे एक खास भावनिक गोष्ट दडलेली आहे. वडिलांचं नाव लक्ष्मीकांत आणि आईचं नाव प्रिया यांची जोड देत तिने या ब्रँडचं नामकरण केलं आहे. “या ब्रँडच्या माध्यमातून मी आई-वडिलांच्या आठवणी जिवंत ठेवत आहे. हा फक्त बिझनेस नसून माझ्यासाठी एक भावनिक प्रवास आहे,” असं स्वानंदीने सांगितलं.

मराठी चित्रपटसृष्टीशी बेर्डे कुटुंबाचं घट्ट नातं आहे. वडिलांच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे, आई प्रिया बेर्डे यांची लोकप्रियताही आजही ताजी आहे. भाऊ अभिनय बेर्डे अभिनय क्षेत्रात करिअर करत असताना, स्वानंदीने मात्र उद्योजकतेचा मार्ग निवडला आहे. “सर्व स्वप्नं करिअरशी संबंधित नसतात; काही स्वप्नं मनातून जन्म घेतात. ‘कांतप्रिया’ त्याचं उत्तम उदाहरण आहे,” असं ती म्हणाली.

इन्स्टाग्रामवर स्वानंदीचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. तिचा फॅशनेबल आणि स्टायलिश अंदाज नेहमीच चर्चेत असतो. मात्र, आता उद्योजिका म्हणून ती नवी ओळख प्रस्थापित करत आहे. तिच्या या धाडसी पावलाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे. चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत तिच्या या उपक्रमाला भरभरून साथ दिली आहे.

स्वानंदी बेर्डेच्या या उपक्रमामुळे बेर्डे कुटुंबातील आणखी एक नवी ओळख प्रेक्षकांसमोर आली आहे. वडिलांच्या नावाशी निगडित असलेला हा ब्रँड तिच्यासाठीच नाही तर मराठी चाहत्यांसाठीही एक भावनिक क्षण ठरत आहे. ‘कांतप्रिया’ या नव्या ब्रँडमुळे स्वानंदीचा उद्योजकीय प्रवास किती यशस्वी ठरतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com