मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात गळती सुरु

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात गळती सुरु

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात गळती सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on

निसार शेख, चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात गळती सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. काम निकृष्ट दर्जाचे असल्यानं मनसेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बोगद्याला गळती लागल्यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता काम निकृष्ट दर्जाचे असल्यानं मनसेकडून नाराजी व्यक्त केली असून मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी त्याची पाहणी करून नाराजी व्यक्त केली आहे.

ठेकेदारांची चौकशी करण्याची मनसेकडून मागणी करण्यात येत आहे. सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून करोडो रुपये पाण्यात गेले आहेत. याला ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार असून त्याची चोकशी करावी अन्यथा मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वैभव खेडेकर यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com