सध्या सर्वत्र बिपरजॉयची चर्चा आहे. फक्त या वर्षीच नाही तर दरवर्षी कोणत्या ना कोणत्या वादळाचं नाव आपण ऐकतो. मात्र, वादळांना नावं कशी दिली जातात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चक्रीवादळांची नावे जगाच्या विविध भागात वेगवेगळ्या संस्थांनी दिली आहेत. जागतिक हवामान संघटना आणि राष्ट्रीय हवामान सेवा यासारख्या संस्था नावांच्या निवडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
प्रत्येक देश 10 नावांची यादी तयार करतो,जे त्यांना चक्रीवादळाच्या नावासाठी अनुकूल आहे. या यादीतून कोणतेही नाव निवडून चक्रीवादळाला एक नाव दिले जाते. 2017 मध्ये आलेल्या ओखी वादळाला बांगलादेशने नाव दिले होते या उदाहरणावरूनही हे समजू शकते. चक्रीवादळांचे नाव अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. प्रथम, एखाद्या भागात अनेक वादळे येतात तेव्हा गोंधळ टाळण्यास मदत होते. दुसरे, ते चक्रीवादळांच्या धोक्यांबद्दल जागरुकता वाढवण्यास आणि आपत्ती तयारीला चालना देण्यास मदत करते.
यंदाच्या वादळाचे नाव आहे बिपरजॉय. या नावाची निवड बांगलादेशने ठेवली आहे. हा बंगाली शब्द आहे, ज्याचा अर्थ आपत्ती.