संजय राऊतांकडून नारायण राणेंना कायदेशीर नोटीस

संजय राऊतांकडून नारायण राणेंना कायदेशीर नोटीस

नारायण राणे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बदनामीचा दावा ठोकला आहे.

नारायण राणे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बदनामीचा दावा ठोकला आहे. आपली त्यांनी बदनामी केल्याचा आरोप राऊत यांनी केला असून कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामळे आता नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांनी संजय राऊत माझ्यामुळे खासदार झालेत, त्यासाठी मी पैसे खर्च केल्याचा दावा केला होता. त्यामुळे राऊत यांनी राणे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, माझे मतदार यादीत नाव नव्हते हे नारायण राणे यांनी सिद्ध करून दाखवावे. तसेच राज्यसभेत निवडून आणण्यासाठी पैसे खर्च केलेत म्हणजे नेमकं काय केलंत ? असे पैसे खर्च खर्च करणे म्हणजे अँटिकरप्शन अंतर्गत हे प्रकरण येतं.  तसेच २००४ मध्ये माझे  नाव मतदार यादीत होते. माझे मतदार यादीत नाव नव्हते, हे ते खोटे बोलत आहे. मला आता त्याविषयी काय बोलायचे नाही. त्यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार आहे. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com