जितेंद्र आव्हाड यांचं थेट पोलिसांना पत्र

जितेंद्र आव्हाड यांचं थेट पोलिसांना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त महेश आहेर यांचा थेट अंडरवल्ड सोबत संबंध असल्याचे एक खळबळाजनक ट्विट केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त महेश आहेर यांचा थेट अंडरवल्ड सोबत संबंध असल्याचे एक खळबळाजनक ट्विट केले होते. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आली. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमकावणारी कथित क्लिप व्हायरल झाली आहे.

या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रारही नोंदवली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकरांना यांना पत्र लिहिलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी पत्रात लिहिले की, मला आणि माझ्या कुटुंबीयांना ठार मारण्याचा कट आहे. आहेर हा संघटीत गुन्हेगारीचा म्होरक्या आहे. माझा व माझ्या परिवाराचा जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेले कारस्थान व त्यासाठी आवश्यक असलेल्या संघटित गुन्हेगारीचा व भ्रष्टाचाराच्या पैशाचा दुरुपयोग या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर व दखलपात्र असल्यामुळे त्याबाबत आपण गुन्हा नोंद करुन कायदेशीर प्रमाणे योग्य तो तपास करावा. असे आव्हाडांनी पत्रात लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com