HDFC Bank : HDFC बँकेच्या CEOला पदावरून हटवा'; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी लीलावती मेडिकल ट्रस्टची मागणी

'एचडीएफसी बँकेच्या सीईओला पदावरून हटवावं, अशी मागणी लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने केली आहे.
Published by :
Prachi Nate

'एचडीएफसी बँकेच्या सीईओला पदावरून हटवावं, अशी मागणी लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने केली आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सेबी, रिझर्व्ह बँक आणि वित्त मंत्रालयाकडे कारवाईची मागणी करण्यात आली आहे. लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्ट ही एक नोंदणीकृत धर्मादाय संस्था असून ती सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी काम करते.

या ट्रस्टने एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सशिधर जगदीशन यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने स्वीकारलेल्या आणि एफआयआरमध्ये नमूद झालेल्या माहितीनुसार, जगदीशन यांचा गंभीर आर्थिक फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, विश्वासाचा गैरवापर, पुरावे नष्ट करणे आणि न्याय प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे या प्रकरणांमध्ये थेट सहभाग असल्याचे म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com