वर्ध्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाखोंचा दारूसाठा जप्त

वर्ध्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाखोंचा दारूसाठा जप्त

तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नार्को पथकाची दबंग कारवाई

भूपेश बारंगे|वर्धा: जिल्हा हा दारूबंदी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री केली जाते.हे पण तेवढंच खर आहे.जिल्ह्यातील दारू विक्रीला कुठेतरी आळा बसावा. याकरिता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण चेहरा व धडक कारवाई करणारा पोलीस अधीक्षक वर्धा जिल्ह्याला देण्यात आला. नव्याने आलेले पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा दारू विक्रेत्यानी चांगलाच धसका घेतला असला तरी आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होताना दिसून येत आहे तर काही ठिकाणी दारूसाठा ही मिळून येत आहे. आज तळेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नांदोरा पुनर्वसन परिसरात आर्वी उपविभागीय अधिकारी यांच्या नार्को पथकाने धाड टाकून लाखो रुपयांचा देशीविदेशी दारूसाठा आढळून आला.या कारवाईने खळबळ उडाली आहे.

नांदोरा पुनर्वसन येथील जसवंत सिंग लहरसिंग आंद्रेले यांच्या राहत्या घरी पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत 28 पेट्या देशी , तीन पेट्या विदेशी दारू ,इम्प्रेरीयल ब्ल्यू कंपनीची एक पेटी, ट्यूबर बर्ग कंपनीची एक पेटी असा दारूसाठा आढळून आला. याच कारवाईत एक जुनी फोर्ड आयकॉन कंपनीची चारचाकी गाडी क्रं. महा 31 सीएस 6644 जप्त केली.जवळपास या कारवाईत 4 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत जसवंत सिंग लहरसिंग आंद्रेले याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंखे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन, भास्कर मुद्दगल ,सतीश जांभुळकर ,अतुल अडसड , प्रदीप दातारकर,सुनील मळणकर, दिगंबर रुईकर, अतुल गोटे, सुरज मेंढे सुरेंद्र कांदे, स्वप्नील वाटकर, अंकुश गोपनारायण यांनी केली.

तळेगाव पोलिस करतात तरी काय?

तळेगांव श्यामजीपंत पोलीस ठाण्याअंतर्गत लाखो रुपयांचा दारूसाठा नार्को पथकाला आढळून आल्याने त्यांनी तो साठा जप्त ही केला, मात्र तळेगांव पोलिसांना या दारूसाठा बाबत कुणकुण लागली नसावी हा प्रश्न आहे. सध्या पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दारू विक्रेत्यांचा पळापळ केली असूनही काही पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांची कारवाई करण्यास कुचराई केली जात असल्याचे दिसून येत आहे. असा प्रश्न सर्वसामान्य करताना दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com