अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्काराची यादी जाहीर, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्काराची यादी जाहीर, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

अर्जुन पुरस्कारासाठी 25 खेळाडूंची, तर सात प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ साठी खेळाडू आणि प्रशिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यासोबतच अर्जुन पुरस्कारासाठी 25 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सात प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चार खेळाडूंना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबर रोजी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना हे पुरस्कार देतील.

अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्काराची यादी जाहीर, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान
सत्तारांच्या 'त्या' विधानाचा अजित पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, मंत्री पदे येतात जातात....

अर्जुन पुरस्कारांची यादी

सीमा पुनिया (अ‍ॅथलेटिक्स), अल्डोस पॉल (अ‍ॅथलेटिक्स), अविनाश मुकुंद साबळे (अ‍ॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणॉय (बॅडमिंटन), अमित (बॉक्सिंग), निखत जरीन (बॉक्सिंग), भक्ती प्रदीप कुलकर्णी (बुद्धिबळ), आर. प्रज्ञानानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (जुडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बॉल), सागर कैलास ओवलकर (मलखांब), इलावेनिल वालारिवन (नेमबाजी), ओमप्रकाश मिथरवाल (नेमबाजी) , श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकूर (वेटलिफ्टिंग), अंशू (कुस्ती), सरिता (कुस्ती), परवीन (वुशू), मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण ढिल्लोन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्नील संजय पाटील (पॅरा स्विमिंग), गर्लिन अनिका जे (कर्णबधिर बॅडमिंटन).

द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणीतील प्रशिक्षकांसाठी)

– जीवनजोत सिंह तेजा (आर्चरी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा सिद्धार्थ शिरूर (पॅराशूटिंग), सुजीत मान (कुस्ती).

द्रोणाचार्य पुरस्कार (लाइफटाइम कॅटेगिरी)

– दिनेश जवाहर लाड (क्रिकेट), बिमल प्रफुल्ल घोष (फुटबॉल), राज सिंग (कुस्ती).

Lokshahi Marathi
www.lokshahi.com