ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून उमेदवारी?

ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून उमेदवारी?

ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. असे राऊत यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी

बुलढाणा - नरेंद्र खेडेकर

यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख

मावळ - संजोग वाघेरे-पाटील

सांगली -चंद्रहार पाटील

हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर

छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे

धाराशिव - ओमराजे निंबाळकर

शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे

नाशिक - राजाभाई वाजे

रायगड - अनंत गीते

सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत

ठाणे - राजन विचारे

मुंबई-ईशान्य - संजय दिना पाटील

मुंबई-दक्षिण - अरविंद सावंत

मुंबई-वायव्य - अमोल कीर्तिकर

परभणी - संजय जाधव

मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com